सह्याद्रीच्या जंगलांचा राजा

“ सुंदर – मोहक ” असे ह्या सह्याद्रीचे कडे, मखमली हिरव्या डोंगरा वरील फुलांचे ते सडे

गार, मंद, रम्य अशा या वाऱ्या चे वाहणे, आणि रिमझिम त्या झऱ्याचे ते सतत धावत राहणे.

सह्याद्री नव्हे हा तर आहे नटलेला स्वर्गाचा साज, ह्याच स्वर्गावर  इंद्र नव्हे तर धनेश करतो राज,

ह्या सह्याद्रीला जिवंत ठेवण्याचा आहे त्याचा गाजावाजा, म्हणून म्हणतात धनेशला ह्या सह्याद्रीचा राजा.

सह्याद्री ची रांग म्हणजेच पृथ्वी वरील स्वर्ग, पाहटे सुर्योदयाच्या वेळी सुर्याची कोवळी किरणे ह्या स्वर्गाला जागे करतात. आणि हा स्वर्ग सुंदर सोनेरी धुक्यांमध्ये जागा होतो, आणि त्या सोबत जागे होतात ते म्हणजे या स्वर्गाचे शिलेदार, लहान कीटकांपासून ते मोठ्या प्राण्यांन पर्यंत आणि लहान झुडपांपासून ते भल्या मोठ्या महाकाय वृक्षां पर्यंत, आणि तेव्हा  सह्याद्रीचे हे जंगल सोनेरी, केशरी, आणि पांढर्या ह्या रंगांमध्ये रंगून जाते. हा स्वर्ग दिवसा जितका सुंदर आणि अनोखा आहे तितकाच तो रात्री देखील जादुई असा आहे, चंद्र्याच्या त्या रम्य अशा प्रकाशात जणू चंद्राचे अमृत ग्रहण करून हे सह्याद्रीचे म्हणजेच, पश्चिम घाटाचे जंगल अमर होत असते. ह्या सह्याद्रीला दिवस रात्र  जिवंत ठेवण्याचे काम हे तिथले पशु पक्षी करतात.

तस बघायला गेल  तर ह्या सह्याद्री मध्ये बरेच असे शिलेदार आहेत. परंतु ह्या सह्याद्रीच्या राजाची बातच वेगळी आहे, जणू ह्या सह्याद्रीने त्याला सौंदर्याचे संपूर्ण वरदान दिले आहे, त्याचा रुबाब आणि त्याच ते आलोखीत सौंदर्य. अगदी तो ह्या  सह्याद्रीच्या जादुमई नगरीत राजा म्हणून जन्माला आल्या सारखा आहे. आणि तो म्हणजे महा धनेश.

महाधनेश (शास्त्रीय नावःBuceros bicornis ; इंग्लिश: Great Hornbill / Pied Hornbill, ग्रेट हॉर्नबिल / पाईड हॉर्नबिल) हा भारतीय उपखंड, मुख्यभूआग्नेय आशिया, व द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट या भूप्रदेशांत आढळणाऱ्या धनेश ह्या प्रजांती मधील एक आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची चविष्ट फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे.भारतातील केरळ राज्याचा राज्यपक्षी ग्रेट इंडियन हॉर्नबिल याला ग्रेट पाईड हॉर्नबिल म्हणूनही ओळखले जाते. या पक्षाची प्रजात भारतीय उपखंडात आणि आग्नेय आशियामध्ये आढळून येते. हे पक्षी प्रामुख्याने फळे खातात, पण याबरोबरच लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्षी यांची शिकार करून हि ते आपली उपजीविका करतात. भारतातील धनेश पक्षी करड्या रंगाचा असतो. डोके, पाठ, छाती आणि पंख काळे असतात, पंखांवर पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. मान आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. शेपटी लांब आणि पांढरी असते. शेपटीच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे आणि मादीचे पांढरे असतात. चोच मोठी, मजबूत, बाकदार पिवळी असते.

ग्रेट हॉर्नबिलबद्दल न्‍यिशिसचे स्नेह त्यांच्या लोककथा आणि पौराणिक कथांमधून शोधले जाऊ शकते, जेथे पक्षी त्याच्या सौंदर्य आणि शहाणपणासाठी आदरणीय आहे. ‘बोपिया’आदिवासींची हि जात, त्यांच्यात धनेश पक्षाच्या पिसांचा वापर करून टोपी बनवली जाते, आणि त्यांच्या परंपरेत धनेश ला खूप महत्वाचे स्थान आहे. आणि ती टोपी परिधान करणार्‍याला  एव्हीयन देवतेशी असलेले त्याचे संबंध जागृत होतात, असा त्यांचा समज आहे. आणि तसेच ह्या पक्षाचे चित्रण आणि आदर नागांनी (आदिवासी) युगानुयुगे केले आहे. तेथील हॉर्नबिल फेस्टिव्हल मध्ये गायल्या गेलेल्या लोककथा आणि गाणी या पक्ष्याचे महत्त्व दर्शवतात. पक्ष्यांच्या पिसांचा उपयोग नागांच्या लोकांच्या आणि योद्धांच्या शिरोभूषणांना सजवण्यासाठी केला जातो. म्हणजेच धनेश हा वन संस्कृतींमध्ये देखील पाहायला मिळतो.

सह्याद्रीच्या जंगलांचा राजा

मामा च्या गावी जायला कोणाला आवडत नाही ?, असा कोणी मिळणारच नाही ज्याला मामा च्या गावाची ओढ नसेल, मग ते गाव जर सह्याद्रीच्या कुशीतले असेल तर विचारायला च नको. असच सह्याद्रीच्या डोंगर रांगेच्या आडोशाला आहे, माझ्या मामा च गाव. रम्य – सुंदर अस लहानस, पण खूप जीवाभावाच गाव. चारही बाजूनी जंगल आणि निसर्गाचे सौंदर्य लाभलेलं गाव. अशा ह्या मामा च्या गावी आम्ही कधी हि गेलो तर प्रत्येक वेळी मामा आमच्या सोबत खूप काही खाऊ पाठवून देत असत, ह्या वेळेस पण मी खूप काही घेऊन आले पण तो खाऊ नव्हे, तर अनुभव. हि सुट्टी माझ्या आयुष्यातली खूप खास ठरली, कारण सह्याद्रीच्या राजा ला पहायचा योग आणि त्याची जीवनशैली  अनुभवण्याचा  योग हा माझ्या साठी नक्कीच खूप खास होता.

कर्कश्य अशा आवाजातून, प्रदुषणाने भरलेल्या ह्या जगातून आणि काबाड  कष्टातून  आम्ही निघालो आमच्या मामच्या गावी, मी ८ वर्षां नंतर मामा च्या गावी चाले होते. मनमोहक अशा दर्या, डोंगर , पर्वत आणि झरे बघत. ह्या गोंधळलेल्या शहरातून एक रम्य ठिकाणी.  आम्ही मामा च्या गावी पोहोचलो, तिथे पोहोचताच माझ्या मनातील  त्या ८ वर्ष आधीच्या आठवणींची पान उलगडली. तेच लहान गाव, त्याच्या आजूबाजूची सुंदर अशी जंगंल  आणि त्या झाडांच्या गर्दीतून येणारे पक्षांचे आवाज, जणू ते आमचे स्वागत करत होते, त्या आवाजा मधून मला ऐकू आला एक विशेष आवाज आणि त्यानी माझ लक्ष वेधून घेतले.  

रात्री आम्ही सगळे  बसून आम्ही जंगलाच्या भुतांच्या गोष्टी करत होतो. कुतूहलाने माझ्या लहान भावाने मामा ला विचारले “ मामा एवढ मोठ हे जंगल , एवढी दाट  झाडी, मग त्यात नक्कीच जंगलाचा राजा राहत असणार ना” मामा ने  उत्तर दिल “हो पण तो वाघ नव्हे”, इतक बोलून सगळे आपापल्या कामात लागले पण माझ्या मना मध्ये ह्या गोष्टीने एक कुतूहल निर्माण केले, मी मामा ला विचारल कि खरच ह्या विशाल जंगलाचा राजा कोण, माझ्या मनातील ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठीची उत्सुकता मामा ने ओळखली. आणि त्यावर तो म्हणाला “मी सांगून मज्जा नाही, तू स्वतः त्या राजाला शोध” , अस बोलून मामा तिथून हसून निघून गेला. आणि मला एक काम देऊन गेला ते म्हणजे शोध ह्या सह्याद्रीच्या जंगलाच्या राजाचा.   

सकाळी पहाटे सूर्याची कोमल किरणे आणि त्या सोनेरी किरणां मध्ये  पांढरी अशी धुक्यांची चादर चमकत होती. आणि त्याच क्षणी आवाज आला तो  थेट त्या जंगलातून पक्ष्यांचा, पण त्यात एक आवाज अतिशय वेगळा होता.त्या आवाजाच्या दिशेने मी चाल केली मनामध्ये उत्सुकता  घेऊन. तो होता महा धनेश एका मोठ्या अशा झाडावर बसून तो त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. त्याला बघताच क्षणी मी चक्क झाले. इतकी सुंदर शरीररचना आणि रंग. तो मला  ह्या  सह्यार्दीच्या मायावी जंगल कथेतील एक पात्र वाटू लागला. तिथे त्या झाडा खाली एक आज्जी त्याला नमस्कार करत होत्या. हे पाहून मला कोड पडल आणि मला राहावल नाही, मी त्या अज्जिंना जाऊन विचारल. “हो मान्य आहे हा पक्षी एक अद्भुत करिष्मा आहे पण हे अस हात जोडून त्याला अंधश्रद्धेच रूप तुम्ही का देताय”  त्या हसल्या आणि मला म्हणाल्या “हो दिसायला शहरातून आल्या सारखी दिस्तीस तू पोरी, म्हणून तुला माहिती नाही ह्या सह्याद्री मध्ये असे अनेक जंगले निर्माण करणारा हा पक्षी आहे”, आणि इतक बोलून त्या तिथून निघून गेल्या.  तेव्हा समजल ह्या सह्याद्रीच्या ह्या निळेशार आकाशात भरारी घेऊन, आणि ह्या सह्याद्रीवर नजर ठेवणारा हा धनेश म्हणजेच ह्या सह्याद्रीचा राजा आहे?

पण ह्याला राजा का म्हणत असावे? असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिला. हळू हळू मला समजत गेले कि तो जि फळे खातो त्याचे मोठ्या प्रमाणात परगण  हे ह्या धनेश च्या विष्ठे मार्फत होते, आज ह्या सह्य्द्रीच्या कुशीमध्ये जि जंगले श्वास घेत आहेत त्यातली बरीचशी झाडे हि ह्या धनेश ची देण आहेत. ह्या भव्य अशा जंगलांना जिवंत ठेवण्याचे काम हा महा धनेश करतो. ह्या सह्य्द्रीचे शिलेदार  बरेच आहेत पण राजा मात्र एक तो म्हणजे हा धनेश. एकदम विचाराचे चक्र थांबले, कारण ज्या राजाचा मी शोध घेत होते तो मला सापडला. तसच ह्या पक्षावर मी दिवसां-दिवस अजून माहिती गोळा करू लागले. आणि माझ्या डायरी मध्ये लिहू लागले.जसे कि,  या पक्ष्यांची चोच फार मोठी व शिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिड़ि या पक्षिकुलात यांचा समावेश आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशियात भारतापासून फिलिपाईन्स बेटांपर्यंत हे  आढळतात. भारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे.  आता वाटू लागले कि ह्या राजाला मी शोधले माहिती गोळा केली. पण एक खूप मोठा धडा माझी वाट बघत होता. जो मला एक नवीन ओळख देणारा होता, आणि ह्या महा धनेश आणि ह्या सह्यार्दी सोबतच माझ नात कायम स्वरूपी ठाम करणारा होता. मी शहरातून आलेली. भविष्यात काय होणार आहे याची जराही कल्पना नसलेली, ह्या सह्याद्रीच्या राजाला शोधून काढल्याच्या आनंदात रमलेली होते.

धनेश हे  अरण्यात राहणारे पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात. त्यांच्या असामान्य स्वरूपामुळे ते सहसा नजरेतून सुटत नाहीत. उडत असताना त्यांच्या  पंखांचा होणारा आवाज दीड किमी. वर तरी ऐकू येतो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत राहतात. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात. महा  धनेशाचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासुन एप्रिलपर्यंत असतो. या काळातले याचे एकंदर वर्तन करड्या धनेशासारखेच असते.

मामा च्या शेता समोरील झाडावर एक धनेश चे जोडप होत. मादी त्या झाडाच्या ढोली मध्ये होती, काही दिवसांपूर्वी नराने तिला माती , आणि चीक्खल आणून दिला होता, कारण त्याच्या सहायाने ती मादी त्या ढोलीचे  तोंड बंद करत होती. तसाच नराने आणलेला चीक्खल आणि तिझ्या विष्ठेच्या सहायाने फक्त चोच बाहेर येईल इतपत जागा ठेवून तिने अख्या ढोलीचे तोंड लेपून टाकले होते, तिने अंडी दिली होती आणि त्या ढोली मधून आता  पिल्लांचा आवाज यायला सुरु झाला होता. नर मादी साठी स्वादिष्ट फळ आणि कीटक आणून देत होता. काही दिवसांनी ती पिल्लं  मोठी होतील आणि मादी ते लेपलेल्या ढोलीच तोंड  तोडून त्यातून बाहेर येईल, आणि त्यांच्या गुबगुबी पिल्लांना नर आणि मादी हे दोघे मिळून खाऊ चारतील.

ह्या सुंदर अशा पक्षाला धोका देखील तितकाच आहे, धनेश पक्षी खूप अशा आदिवासी लोककलेचा देखील भाग आहे. ह्या महा धनेश ला घेऊन काही रूढी आणि परंपरा देखील आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आजही ह्या लोक कलेमध्ये जिवंत आहेत. परंतु त्यांची कमी होत असलेली संख्या, हे एक गंभीर विषयाचे कारण आहे.

 रोज माझी पहाट तिथल्या असलेल्या धनेश च्या स्वराने व्हायची, मामा च गाव सोडून जावस वाट्त नव्हत. ह्या सह्यार्दीच्या  राजाच्या राज्यात माझ मन अडकल होत. अशीच एक पहाट आणि मामा ने मला सांगितले कि “त्या शेतासामोरील धनेश च्या ढोलीमध्ये घोरपडीने चढाई केली होती,परंतु  त्या ढोली मध्ये असलेल्या मादीने त्या घोरपडीला हिसकावून लावले”,  घोरपड  धनेश चे सगळ्यात मोठे शत्रू, ते  अंडी आणि पिल्ल खाण्याच्या हेतूने नेहमी धनेश च्या ढोली मध्ये शिरकाव करत असतात. हे ऐकताच क्षणी मी त्या ढोली कडे धाव घेतली, ढोली सुखरूप होती आणि नर देखील अन्न आणून मादीला चारत होता. हे दृश्य बघून मनातील वाईट विचार थांबले. ते सुखरूप होते आणि आनंदात होते. परंतु मना मध्ये एक दाट विचार आला कि खरच जर घोरपडीने ह्या पिल्लांना आणि मादीला इजा पोहोचवली असती तर, ह्या गावी आल्या पासून माझी नजर नेहमी त्या ढोलीकडे असायची आणि जर हा विचार खरा झाला असता तर त्या नर आणि मादीचे सर्व परिश्रम वाया गेले असते . मी त्या ढोली कड पाठ फिरवली. निसर्गाचा नियमच असतो, भक्ष आणि भक्षक परंतु समजत नवत कि का मला वाईट वाटत होत.

मामा च्या गावी त्या सुट्टी मध्ये एका लहान मुली सारखी मी खूप भ्रमंती केली, त्याच जादुई अशा जंगला मध्ये. जेथे त्या राजा चे अस्तित्व आहे. निसर्गाचे सौंदर्य आणि ह्या महा धनेश चे कार्य बघत. वेळ आणि दिवस कसे निघून गेले समजल देखील नाहि. आता वेळ आली ती घरी परतण्याची, अचानक एक धनेश येउन मामा च्या घरा समोरील झाडा वर बसला. त्या वर गावातील लोक ह्याला एक शुभ संकेत मानायला लागले. तेव्हा आभास झाला कि हा धनेश माझ्या साठी एक नवीन सुरुवात घेऊन आला आहे. ह्या सह्याद्रीच्या रम्य अशा निसर्गा मध्ये हे सह्याद्रीचे राजे मोकळ्या हवे मध्ये भ्रमण करतात. आणि वनांची संख्या हि वाढवतात.

मामा च्या गावातून परतून मी माझ्या सोबत एक उद्देश घेऊन आले तो म्हणजे धनेश च संवर्धन. आता पुन्हा झेप घेतली  परत मामा च्या गावाची ,  पण सुट्टी मध्ये नाही तर ह्या तांत्रिक जगातून कायमची सुट्टी घेऊन त्या सह्यार्दीच्या राजाचे संवर्धन करण्या साठी ची. किती गुपित आणि किती रहस्यमई  असत न जंगल. कोणाचे कार्य किती महत्वाचे ठरू शकते हे त्या बिचार्या मुक्या जीवाना ठाऊक

हि नसेते. पण माणसाला आसते. मग अशा ह्या महा धनेश चे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याची अवैध्य शिकार, संस्कृतीच्या नावा खाली त्याची होत असलेली मारहाण ह्या सगळ्या गोष्टी फक्त माणूसच समजू शकतो.आणि थांबू शकतो. 

प्रत्येक प्राण्याला आहे ह्या सृष्टीचा अधिकार , करू नका त्यांचा तिरस्कार

चला वाचवू तर मग ह्या सह्याद्रीच्या राजाला, जो जिवंत ठेवतो सह्याद्रीच्या जंगलाच्या श्वासाला